शुक्रवार, 24 जुलाई 2020


YASH GOAT FARM & SEED        

At-fattepur Tel-neva mosa Dist-Ahmeadnagar (Maharashtra) pin-414606
Contact-9850625022/7350334378/9075747714
Gmail address- Yashgoatfarm&seeds
------------------------------------------------------------------------

 1)

Dashrat grass दशरथ घास
-------------------------------------------------------------------------------------------------

2)

G.B.NO-1/गा बकरी घास
-------------------------------------------------------------------------------------------------
3)
GB-NO-2/गाय बकरी घास



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------








------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, 15 जुलाई 2020


YASH GOAT FARM & SEED        

At-fattepur Tel-neva mosa Dist-Ahmeadnagar (Maharashtra) pin-414606
Contact-9850625022/7350334378/9075747714
Gmail address- Yashgoatfarm&seeds
------------------------------------------------------------------------
हमारे पास Goat Farming & Dairy F butarming के लिये सभी प्रकार के Green Fodder Seeds मिलेंगे..
1)

Dashrat grass:-

दशरथ घास हे एक द्विदल जातीचे बहुवर्षीय चारा पीक आहे, याची लागवड आपण बारा महिन्यात केव्हाही करू शकतो, एकदा लावल्या नंतर 4 ते 5 वर्षे टिकतो, यामध्ये 22 ते 25% प्रोटीन आहे, यामुळे तो सर्व जनावरांसाठी पोषक चारा ठरला आहे, दशरथ घासावर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे,,
एक एकरासाठी 12 किलो बियाणे आवश्यकता आहे,
------------------------------------------------------------------------
Alfalfa/lucerne/ Rajka-Grass:-
अल्फा अल्फा लसूण मेथी घास हे एक द्विदल जातीचे एक बहुवर्षीय चांगले पोषण मूल्य असलेले चारा पीक आहे, यामध्ये 18 ते 20% प्रोटीन असल्यामुळे दुधारू जनावरांसाठी हे खूप फायद्याचे ठरले आहे, लसूण घासाची लागवड आपण ऑक्टोबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत करू शकता, एकदा लागवड केल्यानंतर 3 वर्षापर्यंततो टिकतो,
एक एकरासाठी 20 किलो बियाण्याची आवश्यकता आहे,
------------------------------------------------------------------------
GB-NO-1 (गाय बकरी घास)
GB No-1 म्हणजे गाय बकरी घास जेकी एक प्रकारचे संकरित कडवळाची जात आहे, एकदा लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षापर्यंत आपण आपल्या जनावरासाठी हिरवा  चारा यापासून देऊ शकतो, एकदा लागवड केल्यानंतर परत परत पेरणीची आवश्यकता नाही, यापासून आपण सुखा चारा म्हणजेच वैरण पण तयार करू शकतो, आणि आपल्या जनावरांसाठी सुखा चारा देऊ शकतो, यामध्ये 14 ते 15 % प्रोटीन आहे, याची लागवड आपण बारा महिन्यात केव्हाही करू शकतो, कुठल्याही जमिनीत तो चांगला येतो,
एक एकरासाठी 3 ते 4 किलो बियाण्याची आवश्यकता आहे,
------------------------------------------------------------------------
4-G Bullet-Super Napier
4g बुलेट सुपर नेपियर म्हणजे नेपियर गवता मधील सर्वात उत्कृष्ट जात, थायलंड मधील आपल्याला कुठल्याही  प्रकारचे काटे,कुश लागणार नाही, 18 ते 20 फुटांपर्यंत उंची गाठणारे, मक्या प्रमाणे चोपडे नरम लवचिक कसदार तसेच मुरघास स्पेशलिस्ट, पाच ते सहा वर्षे चालणारे, यामध्ये 16 ते 18% प्रोटीनचे प्रमाण आहे त्यामुळे आपल्या जनावरांसाठी ते एकदम पोषक चारा म्हणून ठरले आहे, याची लागवड आपण बारा महिन्यात केव्हाही करू शकतो, याची लागवड तीन बाय एक वर करावी लागते,
एक एकर साठी 12000 स्टंप कांडीची आवश्यकता आहे,
------------------------------------------------------------------------
मारवेल गवत:-जिंजवा ग्रास
मारवेल गवत त्याला आपण कांडी गवत किंवा जिंजवा घास म्हणतो, या गवताची लागवड एकदा केल्यानंतर सात ते आठ वर्षापर्यंत हा चारा टिकतो, सर्व प्रकारची जनवारे याला आवडीने खातात, याची लागवड आपण उन्हाळा सोडून केव्हाही करू शकतो, याची प्रत्येक महिन्याला कापणी चालू होते, त्यामुळे आपल्याला हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत नाही, कुठल्याही जमिनीत आपण याची लागवड करू शकतो, गादीवाफा करून त्यामध्ये यांची कांडी लावावी लागते,
प्रति एक एकरासाठी अंदाजे तीस ते चाळीस हजार कांडी लागते,
------------------------------------------------------------------------

गुरुवार, 9 जुलाई 2020

        

YASH GOAT FARM & SEEDS

                 Dashrat grass

          (दशरथ घास)Dashrath grass all information

Dashrat ग्रास:-   दशरथ घास हे एक चांगले पोषण मूल्य असणारे, एक द्विदल जातीचे बहुवर्षीय चारा पीक आहे, ह्या चाऱ्याच्या मुळावर नत्रयुक्तत ग्रंथी असतात, ह्या ग्रंथी हवेतील नत्र सोसत असल्याने झाडाची नत्राची गरज भासते, याशिवाय नत्र शोषण क्रियेत जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचाा कस वाढतो,
दशरथ घासामधील अंदाजे पोषणमूल्य:-  
            मुल्ले प्रतिदिन 22.30 स्निग्ध पदार्थ 24.30
तंतुमय पदार्थ:-24.30 कार्बोदके:-43.50
जमीन:-दशरथ घास कुठल्याही जमिनीत अगदी सहज रित्या येतो,
दशरथ घास पेरणीपूर्वी जमिनीची तयारी:-
एक एकर क्षेत्रासाठी प्रथम आपणास चार ते पाच ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यायचे आहे
नंतर जमिनीची चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत तयार करायची आहे,
पेरणी व लागवड:-दशरथ घासाची लागवड आपण वर्षभरात 12 महिन्यात केव्हाही करू शकतो,
एक किलो बियाण्यामध्ये 3/4 गुंठे क्षेत्र होते,
प्रति एक एकरासाठी 12 kg बारा किलो बियाण्याची आवश्यकता आहे,
(हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये दशरथ घासाची वाढ हळुवार होते,)
                दशरथ घास लागवडीसाठी आपण पाच फुटाचा वाफा तयार करून त्यामध्ये दशरथ घास बियाण्यावर प्रक्रिया करून मेथी घासा प्रमाणे इस कटावे, Step-2 दोन फुटाची सरी पाडून 6/6 इंचावर टोपण पद्धतीने दशरथ घासाची लागवड करावी,
अशा पद्धतीत आपण दोन प्रकारे दशरथ घासाची लागवड व पेरणी करू शकता,
खते व औषधे:-दशरथ घास पेरणीच्या वेळेस प्रति एक एकर पाच ते सहा बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे यामुळेेे दशरथ घास उगवण्यासाठी खूप मदत होते,
    दशरथ घासावर रोगप्रतिकारक्षमता खूप कमी आहे, त्यामुळे यावर जास्त रोग पडत नाही
तरीपण प्रति महिन्याला चांगल्या प्रकारचे कीटकनाशक फवारणी करावी, तसेच चांगल्या प्रकारचे टॉनिक फवारणी करावी, यामुळे आपणाला चारा लवकर कापणीला येतो व हिरवागार चारा मिळतो,
बीज प्रक्रिया:-दशरथ घासाच्या बियाण्याचे कवच खूप जाड कठीण असल्याकारणाने बियावर बीजप्रक्रिया करणे गरजेेचे आहे,
(1) एक किलो बियाण्यासाठी (4) चार लिटर पाणी घेऊन त्या पाण्याला पूर्णपणे उकळी आणावी, उकळी  आल्यानंतर पतीले गॅस/शेगडी/चुलीवरून खाली उतरून ठेवावे, पाण्याची उकळी शांत झाल्यानंतर बियाणे त्या गरम पाण्यात टाकावे, गरम पाण्यात टाकल्यानंतर अर्धा ते एक मिनिट ते बियाणे गरम पाण्यात ठेवावे, एक मिनिटानंतर गरम पाणी काढून टाकावे, व परत चार लिटर गार/साधे पाणी टाकावे, व त्या पाण्यामध्ये ते बियाणे संपूर्ण रात्रभर भिजत घालावे, सकाळी उठल्यानंतर पातील्या मधील उरलेले पाणी काढून टाकून बियाणे सुकून घ्यावे कोरडे करावे,
    आता बियाणे लागवडीसाठी व पेरणीसाठी तयार आहे,
टीप:-आपण आपल्या बियाण्याच्या हिशोबाने  पाणी कमी जास्त करावे..?
....... म्हणजेच 1kg=4 letter 2kg=8 litter अशा प्रमाणे आपलेेे प्रमाण घ्यावे,
कापणी:- पहिली कापणी 75 ते 80 दिवसांनी करावी, दुसरी कापणी प्रति दीड महिन्याच्या अंतरावर करावी,
   दशरथ घास कटींग करतेवेळेस जमिनीला चिटकून कापणी करावी त्यामुळे दुसर्‍या कापणीला आपणाला त्रास होणार नाही,
दशरथ घासाची कापणी सरासरी तीन ते चार फुटांच्या उंचीवर  करावी, जास्त उंची झाल्यास दशरथ घासाचा खालचा भाग खडक होतो, सरासरी तीन ते चार फुटापर्यंत कापणी करून घ्यावी,
टीप:-हलक्या भारी जमिनीच्या कारणामुळे कापणीला कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो...?
कालावधी:-दशरथ घासाची एकदा लागवड केल्यानंतर तो चार ते पाच वर्ष चालतो,
दशरथ घासा पासून आपणाला वर्षभर हिरवा चारा मिळतो,
पाणी:-पहिले पाणी पेरणी  झाल्यानंतर ताबडतोब द्यावे, दुसरे पाणी पाच ते सहा दिवसांनी द्यावे ,बाकी पाणी आपल्या जमिनीच्या आवश्‍यकतेनुसार द्यावे, दशरथ घासाची एकदा कापणी झाल्यानंतर त्याला एक ते दोन महिने पाणी मिळाले नाही तरी तो मरत नाही, म्हणजेच दशरथ घास पाण्याला खूप दम धरतो, दशरथ घास हे पीक कमी पाण्याचे आहे,
दशरथ घासाला कोणते जनावरे खातात:-
   दशरथ घासाला सर्व प्रकारचे जनावरे आवडीने खातात,
म्हणजेच:-शेळी, मेंढी, गाय, म्हैस, बैल, घोडे,इत्यादी प्रकारचे सर्व जनावरे दशरथ घासाला आवडीने खातात, दशरथ घासा मध्ये प्रोटीन चे प्रमाण चांगले असल्याकारणाने जनावरांच्या दूध वाढीसाठी त्याचा खूप फायदा होतो,
साईड इफेक्ट:-दशरथ घासा मध्ये पाण्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे तो लवकर सुकतो, दशरथ घासा मध्ये उष्णतेचे प्रमाण खूप कमी आहे, दशरथ घास जनवाराणे  कितीही खाल्ला तरी त्यापासून कुठलेच साईड इफेक्ट होत नाही, म्हणजेच पोटफुगी, जुलाब, शेळ्या-मेंढ्या गाभडज्ञाचे  प्रमाण अजिबात नाही,
मित्रांनो वरील सर्व माहिती हि मी माझ्या प्रॅक्टिकल तत्वावर अभ्यास करून आपणास देत आहे,
जर कोणाला दशरथ घास बियाणे पाहिजे असेल व इतर माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्या यूट्यूब चैनल ला भेट देऊ शकता, तसेच दशरथ घासा विषयी दशरथ घास लागवड, दशरथ घास बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची याचे संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता,👇👇👇
https://youtu.be/XJqEazGgSgc

सविस्तर माहितीसाठी आपण आमच्या YouTube चैनल व Facebook पेज वरती जाऊन सविस्तर व्हिडिओ बघू शकता,

1)YouTube channel link
 https://www.youtube.com/channel/UC2vKFZgv8Yj2LVF0f6c3SfA?view_as=subscriber,
2):-Facebook page link  https://www.facebook.com/YashGoatFarmar/           

           Dashrat grass/दशरथ घास

जर कुणा शेतकरी मित्रांना डेअरी फार्मिंग साठी व गोट फार्मिंग साठी दशरथ घासाची  लागवड करायची असेल तर आमच्याशी संपर्क करून आपण दशरथ घासाचे बियाणे घरपोहोच मिळवू शकता..,

Contact number..........
           

WhatsAppNo-9850625022  📞calling No-9075747714      calling  No-7350334378

Video..........

1)https://youtu.be/XJqEazGgSgc
2https://youtu.be/ixkDSiLVCkY
3https://youtu.be/Da5aIXlG5XA
4)https://youtu.be/un9FXa1LzRk
Copyright-Yash goat farm & seeds 2020......... Someshwar Lawande