मंगलवार, 20 अप्रैल 2021

Megha sweet मेघा स्वीट हरा चारा

 मेगा स्वीट  कृषिशास्त्र* 


 *बियाणे व पेरणी:* टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी पाच किलो प्रती एकर व पेरणी करण्यासाठी सहा किलो प्रती एकर वापरावे.

 *पेरणीचा काळ* : फेब्रुवारी ते  ऑक्टोंबर.

 *खतांचे नियोजन* : 

नत्र 30 किलो स्फुरद 15 किलो पालाश 15 किलो.

दर 30 दिवसांनी 15 किलो नायट्रोजन पिकाला द्यावे.

 *तन नियोजन* : उगवणीपुर्वी चे तन नाशक

 *ऍट्राझीन* *तीन*3  ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

(लागवडीनंतर  *दोन दिवसांच्या* आत)

 *किड नियंत्रण :* सर्वसाधारणपणे मेगास्वीट मधे खोड माशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी.

लागवडीनंतर *10* ते *13* दिवसानंतर

 *क्लोरोपायरीफॉस* 50% + *सायपरमेथ्रीन* 5%  *2 ml* प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावयाची आहे.

दुसरी फवारणी लागवडीनंतर *20* ते *25* दिवसांनी

 *इमामेक्टीन बेंजोएट* किंवा *क्लोरांत्रानीलीप्रोल*(कोराजन, डेलीगेट, प्रॉक्लेम,) इ. ची फवारणी घ्यावयाची आहे.

पिकाची स्थिती पौष्टिक गुणवत्तेनुसार :

 *फुलोऱ्याच्या* स्थितीत पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडी चे प्रमाण अधिक.

 *कापणी चे नियोजन:* 

बहु कपणीसाठी 

 *60* ते *65* दिवसात पहिली कापणी *6 इंच* वरून करायची आणि लगेच *पाण्यासोबत युरिया देणे* व पुढील कापणी 60 दिवसांनी घ्यावी 

एका कापणीसाठी व जास्तीत जास्त गोडी आणि प्रोटीन मात्रा मिळवण्यासाठी व मुरघासासाठी : *75* ते *80* दिवसांत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें