सोमवार, 31 दिसंबर 2018

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे.  शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात. परंतु सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे. शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्न भेडसावत असतात, ज्यांची ना मिळाल्या मुळे शेळीपालन पासून ते दूर चालले आहेत. असे कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया.

शेळीपालन करताना पडलेले प्रश्न

  1. जास्त संख्येने शेळीपालन कसे करायचे ?
  2. बंदिस्त शेळीपालन कसे करायचे ?
  3. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेळीपालन मधून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल ?
  4. सुरुवातीला कोणती जात निवडायची ?
असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. या सर्व गोष्टींचा आपण या लेखात व या पुढील लेखांमध्ये सविस्तर अभ्यास करूया.

शेळी पालनाचे उद्दिष्ट

शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्चित करणे. बरेचशे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. बऱ्याचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्दिष्ट ठेवायला काही हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरु करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन पेक्षा अश्या प्रकारात जास्त गुंतवणूक असते.
आपल्या गोठ्यातील शेळी हि स्थानिक जातीची असली तरी तिला चांगला जातिवंत जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते व अश्या प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन देणारे असतात. म्हणून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारे बोकड तयार करणे हे देखील चांगले उद्दिष्ट असू शकते व त्यातुन नफा मिळवता येईल.

उस्मानाबादी बोकड

आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या स्थानिक शेळ्यांपासून सुरुवात करणे फायद्याचे व कमी खर्चातील सहज सोपे असते. सुरुवातीला आपल्याकडील शेळीला उस्मानाबादी बोकड वापरला जावा, त्यांच्या संकरातून तयार होणाऱ्या शेळीला सिरोही किंवा जमुनापरी सारखे बोकड वापरले जावेत. जेणेकरून जन्माला करडे हि जन्मतः जास्त वजनाची वेगाने वजन वाढनारी असतिल.
थोडक्यात काय तर उस्मानाबादी शेळ्यांमधील 3 करडे होण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती व सिरोही शेळ्यांमधील वजनवाढीची ताकद, दूध देण्याची क्षमता ग गोष्टी त्यांच्या संकरातून होणाऱ्या करडांमध्ये दिसून येतात. अशा प्रकारे पुढील पिढ्यांमध्ये पुन्हा आपण जमुनापरी, बीटल , बोअर अशा जातीच्या बोकडांचा वापर करून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारी शेळ्यांची करडे तयार करू शकतो. आपल्याकडे असणारया स्थानिक शेळीला उस्मानाबादी, जमुनापरी, सिरोही, बीटल, बोअर, किंवा एखादी उपलब्ध असलेली जातिवंत शेळीची जात वापरून सुधारित बोकडांची निमिर्ती करता येऊ शकते, अश्या प्रकारे या बोकडांमधून स्थानिक मार्केटमध्ये पण चांगला नफा मिळतो.

शेळीपालनासाठी करावयाचे नियोजन

शेळीपालन करताना बंदिस्त गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे नियोजन, किंवा व्यवस्थापन या सर्व गोष्टीना फक्त उपयुक्त आणि सुधारित शेळीच्या असण्यामुळेच महत्व प्राप्त होते. अश्या प्रकारे संकरन करून तयार केलेल्या शेळ्यांना त्यानंतर तितक्याच चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक ठरतात.
  1. बंदिस्त पद्धतीचा गोठा यामध्ये प्रत्येक शेळीस कमीत कमी 15 ते 20 sq ft जागा दिली जाते. व गोठ्यामध्ये वयोगटानुसार कप्पे केले जातात . त्यामुळे सर्व व्यवस्थापन करणे सोपे जाते व शेळीला आपण कळपात असल्यासारखे वाटते.
  2. शेळ्या खरेदी करण्यापूर्वी त्यांना महत्वची लागणारी ओली वैरण, सुका चारा, व खुराक यांचे नियोजन असणे महत्वाचे आहे. ओल्या वैरणीत शेळ्यांना सुबाभूळ, शेवरी, दशरथ अशा प्रकारचा झाडपाला पण देणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर चीकातील मका, निसवलेले ज्वारीचे कडवाळाचा मुरघास बनवनेही फार फायद्याचे ठरते.
  3. दर 3 महिन्याला जंताचे औषध व त्याचबरोबर पी पी आर , आंत्रविषार सारख्या रोगांचे लसीकरण तयार केलेल्या सुधारित शेळ्यांना किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्यांना करणे फार गरजेचे असते. गाभण शेळ्यांनाही जंताचे औषध दिले जावे.
  4. बोकडांचे वजन दररोज वाढत असते अशा वेळेस कोणत्याही गोष्टीमुळे तणाव आल्यास वजनवाढ होणार नाही, यामुळे गोठ्यातील वातावरण , पाणी , चारा नियोजन, बसण्याची जागा या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तरच तणावमुक्त वातावरणात शेळ्यांची चांगली वाढ होईल.
संकरिकरन करून किंवा विशिष्ठ जातीच्या शेळ्या पाळून आपल्याला कमीतकमी दिवसात जास्त वजन हे उद्दिष्ट गाठायचे आहे व त्यासाठीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तरच आपल्या शेळीपालन व्यवसायाची सुरुवात चांगली होईल.

गुरुवार, 27 दिसंबर 2018

महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती

उस्मानाबादी शेळी

  • शारिरीक गुणधर्म :
    • रंग : प्रामुख्याने काळा
    • कान : लोंबकळणारे
    • शिंगे : मागे वळलेली
    • कपाळ : बर्हिवक्र
    • उंची : ६५ ते ७० सें.मी.
    • छाती : ६५ ते ७०सें. मी.
    • लांबी : ६० ते ६५ सें.मी.
  • वजने :
    • जन्मतः वजन : २.५ किलो
    • पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : ३० ते ३५ किलो
    • पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन : ४५ ते ५० किलो
  • पैदाशीचे गुणवैशिष्टये :
    • वयात येण्याचा काळ : ७ ते ८ महिने
    • प्रथम गाभण राहतांनाचे वय : ८ ते ९ महिने
    • प्रथम विण्याचे वय : १३ ते १४ महिने
    • दोन वितामधील अंतर : ८ ते ९ महिने
    • नर-मादी करडांचे जन्माचे प्रमाण. : १ : १
    • ऋतुचक्र (पुन्हा माजावर येण्याचा काळ) : २० ते २१ दिवस

संगमनेरी शेळी

शारिरीक गुणधर्म :
  • रंग - संगमनेरी शेळयामध्ये पांढरा (६६%) पांढरट तांबडा आणि तांबडा (१६%) रंग आढळतो.
  • नाक - तांबडे, काळा रंग आढळतो.
  • पाय - काळे, तांबडा रंग आढळतो.
  • शिंग - अंदाजे ८ ते१२% शेळया हया बिनशिंगी (भुंडया) आढळतात, उर्वरित 
    शेळयांमध्ये शिंगे आढळतात. शिंगाचा आकार, सरळ, मागे वळलेली आढळतात.
  • कान - कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळयामध्ये उभे किंवा समांतर आढळतात.
  • कपाळ - प्रामुख्याने बर्हिवक्र आणि सपाट.
  • दाढी- संगमनेरी शेळयांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते.
  • शेपटी - शेपटी बाकदार आणि सरासरी लांबी १८.४६+०.२५ सेमी आढळते.
  • स्तन - गोलाकार (४२%), वाडग्यासारखे (२५%), लोंबकळणारे (२२%) आढळतात.
    स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात.
वजने : 
वयनरमादी
अ) जन्मतः२.४३+०.११२.०८ ०.०९२
ब) ३ महिने९.२० ०.३५८.७२ ०.२८
क) ६ महिने१६.२४ ०.९८१३.८६ ०.२९
ड) १ वर्ष२३.७२ ०.७१२४.२१ ०३७

    पैदाशीचे गुणवैशिष्टये :
    • वयात येणे (दिवस)- २४५.१९+७.४२
    • प्रथम माजावर येण्याचे वय ( दिवस)- २४८.२३ १३.५६
    • प्रथम गाभण जाण्याचे वय (दिवस )-२८७.०९ १०.१६
    • प्रथम विताचे वय (दिवस ) - ४३२.१८ १२.७७
    • माजाचा कालावधी (तास) - ४१.७३ ०.८०
    • दोन माजांमधील अंतर- २३.८८ ०.४४
    • दोन वेतांमधील अंतर (दिवस)-२३.८८ ३.५७
    • जन्मणा-या करडांची टक्केवारी-१.६२ ०.०४९
    • जन्मणा-या करडांची टक्केवारी १. एक- ४२.२५% २. जुळे- ५४.२३% ३. तिळे- २.८१% ४. चार- ०.७०%
    • दूध- ८० लिटर्स दूध उत्पादन ९० दिवसाच्या वेतामध्ये आढळते.

    सुरती (खानदेशी/ निवानी)

    सुरती (खानदेशी/ निवानी)
    • शारिरीक गुणधर्म :
      • रंगः पांढरा
      • कानः लांबट आणि रुंद
      • कासः चांगली मोठी
      • दुध उत्पादन : दररोज एक ते दिड केलो आणि एका विताच्या हंगामात एकूण १२० ते १५० किलो
      • वास्तव्य : गुजरातमध्ये आणि धुळे ,जळगांव जिल्ह्यांमध्ये
    • वजने :
      • जन्मतः वजन : २.५ किलो
      • पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : २५ ते ३०किलो
    • पैदाशीचे गुणवैशिष्टये :

    कोकण कन्याल

    • स्थान :कन्याल जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील(मुंबई विभाग) समुद्ग किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, लिल्हा म्हणून ह्या प्रसिध्द आहे. आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये ह्या शेळ्या वाढतात हे त्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. कोकण कन्याल शेळी हे कोकणाचे भुषण आहे. कोकण कन्याल शेळीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाण

    • शारिरीक गुणधर्म :
    • रंगः- वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात.
    • पायः- लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात.
    • कातडीः- कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा-या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो. शरीरावर छोटे केस आढळतात.
    • डोक :- नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात.
    • कपाळः- काळ्या रंगाचे, चपटे आणि रुंद असते.
    • कान्‌:- काळा रंग आणि पांढ-या रंगाच्या कडा, चपटे लांब आणि लोंबणारे असतात.
    • शिंगेः- टोकदार, सरळ आणि मागे वळलेली आढळतात.
    • नाकः- स्वच्छ आणि रुंद आढळतात.
    वजने :
    जन्मतः वजन १.७६ ते २.१९ सरासरी १.१९ कि.
    लिंगशारीरीक वजन (कि)उंची (सेमी)छातीचा घेर (सेमी)लांबी (सेमी)
    बोकड५२.५७८३.००९०.००८४.००
    शेळी३२.८३६८.६७४.००७१.००
    पैदाशीचे गुणवैशिष्टये :
    ह्या शेळ्या नियमित आणि वर्षभर माजावर येतात. जुळ्याचे प्रमाण ६६% आढळते उन्हाळ्यामध्ये विणा-या शेळ्यामध्ये जुळ्याचे प्रमाण जास्त आढळते.  

    शेळीपालन- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

    शेळी पालनासाठी लहान पिल्ले/ करडे कोठे मिळतील?
    उत्तर: शेळीचे लहान करडू माहितीसाठी औरंगाबाद येथील शासकीय शेळी पैदास केंद्र पडेगाव येथे संपर्क साधावा. किंवा  नजीकच्या पशुसंवर्धन विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या संबंधी अधिक माहिती घ्यावी.
    २. शेळी पालन केल्या नंतर त्याची विक्री कशी करायची?
    उत्तर: स्थानिक गुरांच्या बाजारपेठेत बोकड विक्री करता येतात. मादी शेळ्या काही शेळी प्रकल्पांना देता येतात. शेळी फार्म सुरु आल्यावर ग्राहक फार्म वरून सुद्धा शेळ्या/बोकड विकत घेऊन जातात असा अनुभव आहे.
    ३. शेळी पालनासाठी काही शासकीय योजना आहेत का? त्या साठी कुणाशी संपर्क करावा?
    उत्तर: शेळी पालनाविषयी काही सरकारच्या योजना आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील उप आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.
    ४. शेळी पालनासाठी उत्तम जात कोणती?
    उत्तर: उस्मानाबादी शेळी दूध आणि मांसासाठी प्रसिध्द आहे. बोअर (अफ़्रिकन) जातीची शेळी खास मांसासाठी जास्त फायदेशीर आहे. उस्मानाबादी शेळीला संपूर्ण शेतात फ़िरुन वेगवेगळा चारा खाण्याची सवय असते. बोअर जातीच्या शेळ्या ह्या गायी म्हशी सारख्या चारा खातात. आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयीनुसार वरीलपैकी जातीची निवड करावी.
    ५. बोअर जातीच्या शेळ्या कुठे उपलब्ध होतील?
    उत्तर: बोअर जातीच्या बोकड करिता निंबकर सीड्स फलटण येथे संपर्क साधावा. फोन Phone: 02166 - 222298, 221375.
    ६. शेळीपालनाविषयी संपूर्ण माहीती द्यावी.
    उत्तर: शेळीपालन या विषयी च्या अधिक माहिती साठी आपण विकासपीडिया http://mr.vikaspedia.in/ या मराठी विकासपीडिया वेबपोर्टला भेट द्या/ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयास किंवा जवळच्या कृषी विद्यापीठाला भेट द्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    ७. शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पहिल्यादा काय करायला लागेल?
    उत्तर: शेळी पालन करण्या पूर्वी या बाबतची सर्व माहिती घ्यावी, या विषयावर प्रशिक्षणे उपलब्ध आहेत,त्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे. काही सुरु असलेल्या शेळी फार्म ला भेट द्यावी आणि नंतरच सुरु करावे !!!
    ८. शेळ्यांना चारा/ खाद्य काय द्यावे? आणि कोणत्या वेळेत द्यावे?
    उत्तर: १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे. सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ इ. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात.
    ९. शेळ्यांना चारा कोणत्या वेळी व काय द्यावा?
    उत्तर: १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे. सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ ए. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात.
    १०. शेळी पालनासाठी प्रशिक्षण केंद्र व पत्ता, शेळ्या मिळण्याचे ठिकाण या संबंधी माहिती द्या.
    शेळी पालनासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशिक्षण राबवले जातात. प्रशिक्षणासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उप आयुक्त पशुसवर्धन यांच्याशी संपर्क साधावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे. तसेच आपल्या जवळच्या पशुमहाविद्यलय किंवा काही ठिकाणी चालू असलेल्या शेळी फार्मला भेट द्यावी

    शेळ्यांची निवड कशी करावी

    किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे.

    पैदाशीसाठी नराची निवड

    1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
    2) पैदाशीचा नर चपळ असावा.
    3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.
    4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
    5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.
    6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
    7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.

    8) पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.

    बुधवार, 26 दिसंबर 2018

    शेळी पालन व तीचे खाने विषयी माहीती द्‍यावी

    अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.

    शेळी पालनाचे फायदे-
    1) अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो 

    2) शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.

    3) शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.

    4) शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.

    5) शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.

    6) शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.

    7) त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.

    8) काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.

    9) शेळयांचे खत उत्तम असते.

    10) आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.

    11) शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.

    12) शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन 

    शेळीच्या मासांत अधिक असते.

    13) शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
    भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.

    आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.

    शेळयांच्या जाती 

    भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.

    बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -

    शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.

    बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन - 

    1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया 

    प-हाटया यांच्या सहायाने करावे

    2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी

    3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे

    4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा

    5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी

    6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी

    7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत 

    8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी

    शेळी पालनातील आहार नियोजन

    शेळीपालनाची सुरुवात करत असताना चांगली जातिवंत शेळीची पैदास कशी करायची, तसेच कोणती उद्दिष्ट ठेवायची हे आपण मागील  लेखात  शिकलो. (तो लेख आपण येथे क्लिक करून वाचू शकता – सुरुवात शेळीपालनाची)
    या लेखात आपण शेळ्यांच्या आहाराचे नियोजन शिकूया.

    शेळीच्या आहारातील जीवनसत्वे

    शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते. जीवनसत्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी,हे घटक येतात.

    शेळीच्या आहारातील विविधता

    फार पूर्वीपासून शेळीपालन करणारा शेतकरी शेळ्यांना रानात चरायला घेऊन जात आहे. अशा प्रकारच्या फिरून खाण्याच्या पद्धतीमुळे एकाच प्रकारचा चारा शेळ्यांना मिळत नाही त्या विविध प्रकारचा चारा खातात. आपणही जेव्हा बंदिस्त शेळीपालन करतो त्या वेळेस शेळीच्या आहारात विविधता ठेवणे फार महत्वाचे आहे.   शेळीचे सुरुवातीचे दूध (चीक) पहिल्या एका तासात पिलांना पाजावे. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लहान पिल्लाना प्रथिनांची व ऊर्जेची आवश्यकता जास्त असते. कोणत्याही वयोगटातल्या शेळीला चारा किव्हा खुराक देताना तिची उत्पादनातील अवस्था लक्षात घेणे गरजेचे असते. जसे लहान वयातील पिल्लाना वजनवाढीच्या खुरकाचे नियोजन करावे लागते.दूध देणाऱ्या गटातील शेळ्या व लहान पिल्ले यांची जीवनसत्त्वाची गरज खूप जास्त असते, या सर्व गोष्टींमुळे शेळीपालन करताना आहाराचे व्यवस्थापन फार महत्वाचे आहे.
     चारा  बदल करतानाची काळजी 
    चारा बदल करताना लक्षात ठेवा-
    1. चाऱ्यातील बदल हा अचानकपणे करू नये. चारा सावकाश बदलावा.
    2. नवीन चारा चालू करताना 20 ते 25 टक्के नवीन चारा व 75 टक्के जुना चारा याप्रमाणे चाऱ्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जावे. पोटातील उपयुक्त जिवाणूंना हा बदल स्वीकारण्यास वेळ लागतो.
    3. चाऱ्याची रोजची वेळ कधीच बदलू नये. व चाऱ्यामध्ये विविधता असावी.
    शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट
    उत्पादन – वजनवाढ
                   दूध
                   गाभनावस्था
                   पैदास
    शेळ्यांची ऊर्जेची गरज हि कर्बोदके व फॅट यातून भागवली जाते.  मिनरल्स हि शारीरिक प्रक्रियांसाठी फार महत्वाची असतात. वजनवाढी साठी व दुधउत्पादनासाठी लागणारी कॅलशिअम सारख्या मिनरल्स ची मात्रा पण वेगळी असू शकते.
    शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा, व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. व यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग (ड्राय मॅटर)  हा खूप महत्वाचा असतो. चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्व हि कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्या मध्ये वेगळे असते, जसा कि लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते त्यात कोरडा भाग 10 ते 20 टक्के असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त 10 टक्के पाणी असते व कोरडा भाग जवळपास 90 टक्के असतो, शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.
    शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थानुसार कोरड्या भागाचे प्रमाण बदलत असते. वजनाच्या 5 ते 7 टक्के कोरडा भाग आहारात दिला जावा. परंतु काही वेळेस 3 ते 4 टक्के एवढे प्रमाणही द्यावे लागते. म्हणून आपल्या गोठ्यातील सर्व शेळ्यांचे वजन माहित असणे फार महत्वाचे आहे. गोठ्याचा आहार ठरवताना सरासरी चाऱ्याच्या गरजेचा अंदाज बांधण्यासाठी शेळ्यांचे वजन व सरासरी कोरड्या भागाचे प्रमाण माहित असणे गरजेचे आहे.
    शेळ्यांना सर्वात जास्त झाडपाला या प्रकारचा चारा आवडतो. मग कोणत्या प्रकारचा झाडपाला आपण लागवड करून शेळ्यांना पुरवू शकतो हे देखील शिकणे महत्वाचे आहे. शेवरी, सुबाभूळ, दशरथ यांची लागवड बाग पद्धतीने केल्यास कायमस्वरूपी किमान एका वेळेस शेळ्यांना त्यांच्या जास्त आवडीच्या चाऱ्याचा पुरवठा करता येईल. यापैकी सुबाभूळ या चाऱ्याचे नवीन वाण देखील बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात बीया नसतात. व झाडपाल्याची गुणवत्ता कोणत्याही मोसमात बदलत नाही.
    पारंपरिक पद्धतीच्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी त्याचबरोबर लसूण घास ( लुसर्न) हा देखील खूप पौष्टिक आहे. हायब्रीड नेपियर, गिनी गवत , पॅरा गवत हे देखील हिरव्या चाऱ्याचे चांगले स्रोत आहेत.
    सुका चारा म्हणून मका व ज्वारीचा कडबा , सोयाबीनचे भुसकाट, किंवा प्रक्रिया केलेला इतर सुका चारा वापरता येतो.
    मुरघास-  चांगल्या प्रतीचा हिरवा चारा हवाबंद करून कमीत कमी 45 दिवस साठवून ठेवल्यास त्याचा पौष्टीक मुरघास तयार होतो व तो आपल्याला शेळ्यांसाठी वर्षभर वापरता येतो. दुष्काळी परिस्थितीत मुरघासाचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी मका या पिकाचा जास्त वापर केला जातो.
    सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी. शेळ्यांना पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी असले पाहिजे. बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यामध्ये तहान लागल्यावर शेळ्यांना मुबलक पाणी पिता येते.

    हायड्रोपॉनिक्स

    या पद्धतीने मकेच्या दाण्यापासून 7 ते 9 दिवसात तयार झालेला हिरवा चारा फार लुसलुशीत असतो व शेळ्या अशा प्रकारचा चारा आवडीने खातात. दुष्काळी परिस्थितीत शेळ्यांना हिरवा चारा पुरविण्यासाठी हि पद्धत फार उपयोगी ठरते.
    दिवसभराच्या वैराणीच्या नियोजनामध्ये झाडपाला,हिरवा चारा व सुका चारा यांचा व्यवस्थित नियोजन केला तर शेळ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाणे शक्य होईल.
    शेळ्यांना खुराक देताना शक्यतो दिवसभरातून 2 वेळेस द्यावा. खुरकामध्ये शेळ्यांसाठी मिळणारे खाद्य हि उपलब्ध आहे. विशेष करून खाद्य वापरात नसलेल्या गोठ्यावर मका, सरकी , खपरी पेंड याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. शेळ्यांची पेंड असो किंवा तयार केलेला खुराक यामध्ये खनिजतत्वाचे मिश्रण टाकणे फार गरजेचे असते,  शरीराच्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी (खनिजतत्वे)मिनरल्स लागतात. दररोज मिनरल्स वापरल्याने शेळी वेळेवर माजावर येणे, गाभण राहण्याचे प्रमाण वाढणे, वजन वाढीस मदद होणे, त्वचा चमकदार राहणे, असे वेगवेगळे फायदे होतात.
    आपण देत असलेला आहार हा सर्व जीवनसत्त्वांचा मिळून तयार झालेला असला पाहिजे. त्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबरच दररोज खनिजतत्वाचे मिश्रण देऊन आपला आहार परिपूर्ण बनवूया. कोणत्याही प्रकारच्या चाऱ्यातील कोरडा भाग जाणून घेऊन त्यानुसार आहाराचे नियोजन करणे हि शेळीपालन व्यवसायातील महत्वाची गरज बनली आहे ..