गुरुवार, 27 दिसंबर 2018

शेळ्यांची निवड कशी करावी

किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे.

पैदाशीसाठी नराची निवड

1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
2) पैदाशीचा नर चपळ असावा.
3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.
4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.
6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.

8) पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें