बुधवार, 26 दिसंबर 2018

शेळी पालन व तीचे खाने विषयी माहीती द्‍यावी

अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.

शेळी पालनाचे फायदे-
1) अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो 

2) शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.

3) शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.

4) शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.

5) शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.

6) शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.

7) त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.

8) काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.

9) शेळयांचे खत उत्तम असते.

10) आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.

11) शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.

12) शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन 

शेळीच्या मासांत अधिक असते.

13) शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.

आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.

शेळयांच्या जाती 

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.

बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -

शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.

बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन - 

1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया 

प-हाटया यांच्या सहायाने करावे

2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी

3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे

4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा

5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी

6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी

7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत 

8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें